सीबीआयकडे पुरावा : `दाभोलकर हत्येच्या दिवशी सचिन कामावर गैरहजर`
तो २० ऑगस्टला २०१३ रोजी दाभोलकर यांच्या हत्येच्या दिवशी कामावर गैरहजर होता
पुणे : दाभोलकर हत्या प्रकरणात एक नवी माहिती पुढे येतेय..सीबीआयच्या ताब्यात असलेला संशयित मारेकरी औरंगाबादेतील ज्या कापड दुकानात कामाला होता. तिथे तो २० ऑगस्टला २०१३ रोजी दाभोलकर यांच्या हत्येच्या दिवशी कामावर गैरहजर होता अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. दुकानाचा मालक कर्मचारी यांचे हजेरी रजिस्टर ठेवतो.
मोठा पुरावा
त्यामध्ये सचिन अंदुरे याने त्या दिवशी कामावर दांडी मारली होती असे दिसतेय. सीबीआयने ते हजेरी रजिस्टर जप्त केल्याची माहितीसुद्धा सूत्रांकडून मिळतेय. १९ ऑगस्टला त्याची साप्ताहिक सुट्टी होती आणि २० ऑगस्टला हजेरी राजिस्टरवर सचिन याची सही नाही. हा हत्या प्रकरणात हा सीबीआयसाठी मोठा पुरावासुद्धा ठरू शकतो.