प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या हेलिकॉप्टरवर सीबीआयची टाच
अविनाश भोसले पुन्हा अडचणीत, DHFL घोटाळाप्रकरणी सीबीआयची कारवाई
पुणे : आताची सर्वात मोठी बातमी आहे. CBI ने पुण्यातील प्रसिद्ध बिल्डच्या घरावर धाड टाकली आहे. सीबीआयने महाराष्ट्रातील पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मालमत्तेवर धाड टाकून हेलिकॉप्टर जप्त केलं. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश भोसले असं बिल्डरचं नाव आहे.
DHFL घोटाळ्या प्रकरणी CBI ने कारवाई केली. तेव्हा अविनाश भोसले यांच्या घरावर या कारवाईदरम्यान धाड टाकण्यात आली. त्यामध्ये ऑगस्टावेस्टलँड कंपनीचं हेलिकॉप्टर जप्त करण्यात आलं आहे.
याआधी अविनाश भोसले यांची ED कडूनही चौकशी करण्यात आली होती. विदेशी चलन प्रकरणात फेमा (FEMA) कायद्यांतर्गत भोसले यांची चौकशी करण्यात आली होती. त्याआधी आयकर विभागानेही त्यांच्या घरावर छापेमारी केली होती.