मोठी बातमी! आता राज्यातील शाळांमध्येही CBSEपॅटर्न, शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा!
Maharashtra Shool CBSE Pattern: राज्यातील शाळांमध्येही CBSEपॅटर्न लागू करण्यात येणार आहे.
Maharashtra Shool CBSE Pattern: महाराष्ट्रातील शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न असलेल्या शाळांमध्ये टाकल्याचे दिसून येते. आपल्या पाल्ल्याने सीबीएसई पॅटर्नमध्ये शिकावे अशी अनेक पालकाची इच्छा असते. पण सीबीएसई शाळांतील शिक्षण महाग असल्याचे म्हटले जाते. अशा पालकांना आता काळजी करण्याची गरज नाही. कारण राज्यातील शाळांमध्येही CBSEपॅटर्न लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सीबीएसईकडे कल वाढला
गेल्या काही वर्षापासून पालकांचा आपल्या मुलांना CBSEबोर्डाच्या शाळेत टाकण्याता कल वाढलाय. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमधील प्रवेशांचे प्रमाण कमी होऊ लागलंय. त्यामुळे शिक्षण विभागानं हा मत्त्वाचा निर्णय घेतलाय. शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी या बाबत माहिती दिलीये.