कल्याण : डोंबिवलीत (Dombivli ) एक विचित्र अपघात घडलाय. डोंबिवली खंबाळपाडा येथील हृदयद्रावक घटना (Heartbreaking incident) पालिकेच्या कचऱ्याच्या गाडी खाली चिरडून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ( Garbage truck crushes woman to death) ही दुर्दैवी  घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंबालपाडा रोडवरुन आज सकाळी 11 च्या सुमारास सुभाष खरोटे आणि निलिमा खरोटे हे दाम्पत्य आपल्या दुचाकीने जात होते. त्यांच्या दुचाकीसमोरच एक गाडी अचानक थांबली. त्यामुळे सुभाष यांचा तोल गेला आणि ते पत्नीसह खाली पडले. तितक्यातच तिथून जात असलेल्या केडीएमसीच्या घंटागाडीच्या मागच्या चाकाखाली येऊन निलिमा यांचा मृत्यू झाला. (Garbage truck crushes woman) सुभाष खराटे यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी घंटा गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.


मागे बसलेल्या निलिमा खराटे या थेट रस्त्यावर पडल्या तोच समोरुन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची घंटागाडी जात होती. त्या घंटागाडीच्या मागच्या चाकाखाली निलिमा खराटे या चिरडल्या गेल्या आणि त्यांच्या डोक्यावरुन घंटा गाडीचे चाक गेले. यात निलिमा खराटे यांचा जागीच मृत्यू झाला.