भाजप नगरसेवकांचा मोठा कारनामा उघड
महापालिकेत भाजपच्या स्वीकृत नगरसेवकानं फाईल पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडालाय.
उल्हासनगर : महापालिकेत भाजपच्या स्वीकृत नगरसेवकानं फाईल पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडालाय. प्रदीप रामचंदानी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल काढून नेतानाचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आलाय. रामचंदानीचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे.रामचंदानी याला डोंबिवलीतील भाजपच्या बड्या नेत्याचं पाठबळ आहे असे सांगितले जाते.