केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर
अवघ्या दोन तासात ३ गावं आणि १ धरणाची पाहणी
मुंबई : राज्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या पाहणी दौऱ्यावर आहे. अवघ्या दोन तासात ३ गावं आणि १ धरणाची स्थिती बघून पथक पुढच्या जिल्ह्याकडे निघालं. दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्राच्या पथकाकडून ११ वाजता पाहणी सुरू झाली. गंगापूर तालुक्यातील टेम्भापुरी गावात दुष्काळग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर आणखी दोन गावात जाऊन त्याआधी सकाळी औरंगाबादमध्ये दुष्काळाच्या दौऱ्यावर आलेल्या पथकाची स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
तासाभराच्या बैठकीनंतर पथक दुष्काळाची पाहणी करण्यासाठी रवाना झालं. भीषण दुष्काळाच्या तडाख्यात सापाडलेल्या मराठवाड्याच्या राजधानीचा दौरा पाहणी दोन तासात उरकून प्रतिनिधी पुढे रवाना झाले. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील हे पथक पाहणी दौरा करणार आहे. राज्याने 151 तालुके हे दुष्काळी म्हणून जाहीर केले असून तसा केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर आलं आहे.