मुंबई : सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले.भाजप शिवसेना २५-३० वर्ष एकत्र हिंदुत्वावर होते. संघाकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही संघात सगळे तयार झाले आहेत असे आठवले म्हणाले. भाजपवर टीका करताना शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे कसे ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जीएसटी कायदा रद्द करण्याची गरज नाही. यात नवीन काही करण्याची गरज नाही. जीएसटी पैसा मिळाला पाहिजे या उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमत असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.
 
सरकार पडेल इतिहास घडेल. महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार स्वतः पडणार असे ते म्हणाले. सरकार खुद गीर जायेगे, महाविकास आघाडी हार जायेगी अशा शब्दात त्यांनी हे स्पष्टीकरण केलं. 


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक दिवस भूकंप होणार असल्याचा इशारा आठवलेंनी दिलाय. 


मुंबई पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर मी कंगनाला पाठींबा दिला नसल्याचं आठवलेंनी पुन्हा स्पष्ट केलंय. मुंबईत तिला येऊ देणार नाहीत या मुद्दयावर मी तिला पाठींबा दिला होता. बाळासाहेब असते तर कंगना त्यांना भेटली असती तातबडतोब हा विषय मिटला असता. त्यामुळे कंगनाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पॉसिटीव्ह भुमिका घेऊन विषय संपवावा असे आवाहन आठवलेंनी मुख्यमंत्र्यांना केलंय.