COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, कसारा. : पावसाळ्यात  मुंबई-पुणे आणि मुंबई-कसारा लोहमार्गवर घाटात दरड कोसळून रेल्वे सेवा बंद होण्याचे प्रकार अनेकदा होतात. यावर मध्य रेल्वेने एक नामी युक्ती शोधून काढली आहे. हिरवी वनराई , कसारा घाटातील बोगदे हे दृश्य टिपले आहे ते ड्रोन केमेऱ्याच्या साहाय्याने. पावसाळ्यात नटलेली ही निसर्ग संपदा बघून डोळ्यांना खूप आनंद मिळतो.  


पण हे दृश्य चित्रित केली आहेत ते सिनेमा साठी किवा निसर्गाचा नजारा पाहण्यासाठी नसून, यावर्षी रेल्वेने ड्रोनच्या साहाय्याने घाटातील अपघात ठिकाणांच्या पाहणीसाठी केली आहे.  मागील वर्षी दोन वेळा दरड कोसळून रेल्वे सेवा बाधित झाली होती. त्यामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याआधीच रेल्वेने तयारी केली होती. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात घाट  मार्गवर रेलवेच्या वतीने कर्मचारी चालत जाऊन दरड कोसळण्याच सर्वेक्षण करतात मात्र काही चुका राहतात.यावर्षी मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन द्वारे सर्वेक्षण केलं आहे.  यात खंडाळा ते पळसदरी येथे 7 ठिकाणी दरड कोसळन्याची ठिकाण सापडली तर 500 ठिकाणी असलेले धोकादायक दगड रेल्वे ने पाडले आहेत. 


तीन इंच पर्यंत जवळ जाऊन ड्रोन कैमरा घाटात चित्रीकरण करत होता. त्यामुळे अगदी जवळून इंजिनियर्सना निरीक्षण करता आले असून तिथे त्या प्रमाणात काम केलं गेले. ड्रोन केमेऱ्यातून निसर्गाच्या वेग वेगळ्या छटा आणि मनमोहक निसर्गाचे दर्शन झाले आणि याच केमेऱ्याच्या साह्याने अपघात ही टाळता येणार आहे.