मुंबई : छगन भुजबळ यांच्यावर राज्य सरकार आणि 'इडी'  अन्याय करत असून हा अन्याय थांबवावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभर तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात आली.  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नांदगाव तहसील कार्यालयावर भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे सत्याग्रह आंदोलन करत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी पिवळे झेंडे, काळे कपडे आणि 'मी भुजबळ' अशा टोप्या घालून हजारो समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसही रस्त्यावर उतरले होते.यावेळी समर्थकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. भुजबळाची तातडीने सुटका करावी अशी मागणी यावेळी आदोलकांनी केली.


भुजबळ समर्थकांचा आरोप


छगन भुजबळ आणि  माजी खासदार समीर भुजबळ यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीकडून चौकशीच्या नावाखाली नाहक कारागृहात डांबून ठेवले असल्याचा भुजबळ समर्थकांचा आरोप आहे. त्यांच्यावर न्यायालयामध्ये अद्यापही कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. मात्र गेल्या २२ महिन्यांपासून शासनाच्या चौकशी यंत्रणेने केवळ चौकशीच्या नावाखाली त्यांना कारागृहात डांबून ठेवले आहे.


‘सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई’


वास्तविक भुजबळांकडून न्यायालयीन चौकशीला संपूर्णपणे सहकार्य केले जात असतांना सरकारकडून मात्र सूडबुद्धीने कारवाई सुरु  असल्याचा आरोप भुजबळ समर्थकांकडून करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केली जाणार आहेत.