अकोला : अकोल्याचे भाजप खासदार आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या खासदारकीला आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर सुलताने यांनी ही याचिका दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय धोत्रेंच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत निवडणुक प्रक्रियेवर अनेक आक्षेप नोंदविण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत दोषपूर्ण वापरण्यात आले. त्यामुळे झालेले मतदान आणि मोजण्यात आलेली मते यात फरक आढळून आला आहे. त्याचा फायदाच धोत्रे यांना मिळाला असल्याचा आरोप ज्ञानेश्वर सुलतान यांनी आपल्या याचिकेत केला आहे. 



निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी आणि नियमांचे काटेकोर पालन केले नसल्याचेही ज्ञानेश्वर सुलतान यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. परिणामी अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या निवडणुकीत संजय धोत्रे यांनी पाच लाख 54 हजार 444 मते घेतली. यात धोत्रे तब्बल 2 लाख 75 हजार 544 मतांनी निवडून आले आहेत. त्यामूळे विदर्भातील 10 पैकी 9 खासदारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. अपात्रतेच्या याचिकेला आता फक्त यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी या अपवाद ठरल्या आहेत.