पुणे : परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी प्राथमिक अंदाजानुसार १०हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. पंचनामे झाल्यानंतर ही रक्कम वाढणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील फटका बसलेल्या  शेतीची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या पाहणी दरम्यानच खासदार सुप्रिया सुळेदेखील पिकांची पाहणी करण्यासाठी तिथं दाखल झाल्या. यावेळी दोन्ही नेते समोरासमोर आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांना पिकांचे नमुने दाखवत शेतकऱ्यांना भरपाई मिळेल की नाही याबाबत चंद्रकांत पाटील यांच्याकडे शंका व्यक्त केली. यावेळी चंद्रकात पाटील यांनी मदतीचं आश्वासन दिलं. सहा तारखेपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आज दिल्लीत असल्यानं ते केंद्राकडून अधिकाधिक मदत मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.