संजय राऊतांना सकाळी जे म्हणायचं असतं तेच दुपारी म्हणतील याची काही शाश्वती नसते; भाजपनेत्याची खरमरीत टीका
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यात काय सुरूये याबाबत आम्हाला काही कल्पना नाही.
कोल्हापूर : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यात काय सुरूये याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत जाणं येणं नेहमीच असतं. कार्यकर्त्यांची काही कामं असतात. वरिष्ठांशी काही चर्चा असतात. त्यामुळे ते जात येत असतात. भाजप सध्या राज्यसभा-विधानपरिषद निवडणुकांच्या विजयाचा आनंद साजरा करीत आहे.
भारतीय जनता पक्षाचा सध्या सुरू असलेल्या घडामोडींमध्ये कसलाही संबंध नाही. भाजप आपले दैनंदिन कामात आहे. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांना ते जरा अधिक आहे. त्यामुळे ते काहीही म्हणतात. असेही पाटील यांनी म्हटले.
सध्या सुरू असलेल्या घटनांशी आम्ही अनभिज्ञ आहोत. कोण कुठे गेले, कोण काय म्हणतंय? आम्हाला माहित नाही. संजय राऊतांना सकाळी जे म्हणायचं असतं तेच दुपारी म्हणतील याची काही शाश्वती नसते.
भाजपला कोणाकडूनही आणि कोणताही प्रस्ताव सध्या आलेला नाही. आल्यास आम्ही त्याची माहिती वरिष्ठांना देतो. ते निर्णय घेतात. असं काही असतं तर तुम्हाला लगेच कळवलं असतं. असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.