मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोल्हापूरचा निकाल हा अनाकलनीय असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोल्हापूरकरांबद्दल वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर माझी बदनामी करण्यात येत असल्याचं म्हटलं असून कोल्हापूरबाबत तसं वाक्य मी झोपेतही उच्चारु शकत नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. कोल्हापूरच्या जनतेबद्दल असं मी झोपेतसुद्धा बोलू शकत नाही असं त्यांनी म्हटं आह. कोल्हापुरातील महायुतीच्या पराभवाची कारणे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पण 'त्या' वक्तव्याचा आणि माझा काही संबंध नसल्याचं ते म्हणाले. 


काय आहे प्रकरण? 


चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातच युतीचा झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. या पराभवाविषयी त्यांनी ही खंत व्यक्त केली. आणखी किती कामं करायची? असा सवाल देखील त्यांनी मतदार राजाला विचारलं. त्यानंतर त्यांनी पराभवाला मतदारांना दोषी नसल्याचंही स्पष्ट केलं. व्हॉट्सऍपवरील एक मॅसेज वाचून दाखवत चंद्रकांत पाटील यांना दाखला दिला. त्या मॅसेजवर पुढे त्यांच असं वक्तव्य होतं की, 'सगळं जग सुधारेल पण, कोल्हापूर सुधारणार नाही.' आणि याच त्यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर टीका झाली.