कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या डोळ्यात रविवारी अश्रू तरळले. बिग बी अमिताभ बच्चन आणि कोल्हापूरातल्या चेतना विकास शाळेतल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत म्हटलं.


 ते पाहून चंद्रकांत दादा पाटील यांना अश्रू अनावर झाले. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना चंद्रकांत दादा पाटील निशब्द झाले. अखेर भाषण आटोपतं घेत त्यांनी कार्यक्रमातून बाहेर पडणंच पसंत केलं.