मुंबई : महामार्ग दुरुस्तीचे काम समाधानकारक असल्याचा दावा करत आज रस्ते विकास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतलीय. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडण्या मागचीही कारणंही पाटलांनी दिली. कंत्राटदाराची दिवाळखोरी आणि भूसंपादन काम यामुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचं त्यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाळा खिंडीत पर्यावरण खात्याकडून परवानगीला विलंब होत असल्याचंही यावेळी पाटील यांनी सांगितलं. शिवाय २०१९ च्या डिसेंबरमध्ये पनवेल ते झारापचं चौपदरीकरण पूर्ण होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. सोबतच, भूसंपादनात अडथळे असतील तेथील मार्ग वळवणार असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलंय.  


आज सकाळीच चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूरही आज पाहणी दौऱ्यात सामील झाले. रस्ते दुरुस्तीसाठी सर्व प्रकारची तंत्रज्ञान वापरणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.