खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजवणार, १० वर्ष खड्डे पडणार नाहीत - चंद्रकांत पाटील
पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबद्दल पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिलंय.
औरंगाबाद : पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबद्दल पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिलंय.
पावसात पडलेले खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजवले जातील, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलय.
‘१० वर्ष खड्डे पडणार नाहीत’
अनेक नवीन कामही लवकर सुरु होतील आणि आता रस्ते बनवताना त्यावर किमान १० वर्ष खड्डे पडणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्य खडडे मुक्त करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याखेरीज बोंडअळीमुळे झालेली नुकसान भरपाई ही कंपन्यांकडून वसूल केली जाईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. ते औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते.
बोंडआळी बाबत कंपन्यांनी नुकसान भरपाई देणार
बोंडआळी बाबत कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यायची आहे. सरकार शेतकऱ्यांच नुकसान होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचा कापूस चांगल्या भावाने घेतला जाईल. बियान कंपन्यांशी बोलन झाल आहे. नुकसान भरपाई त्यांनी द्यायची आहे. त्यावर सरकारचे लक्ष राहील, असेही चंद्रकात पाटील म्हणाले.