अल्पवयीन मैत्रिणीला लॉजवर नेऊन....`, बदनामीच्या भीतीने पीडितीने उचललं टोकाचं पाऊल!
Minor Girl Sucide after Rape: बलात्कार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे.
Minor Girl Sucide after Rape: अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याची घटना बदलापुरातून काही दिवसांपुर्वी समोर आली. यानंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले आणि आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरुन कोणी असे गुन्हे करण्यास धजावणार नाही, तशाप्रकारचे बदल कायद्यात करावे, असे आवाहन सरकारला करण्यात आले. पण अशा घटना थांबताना दिसत नाहीयत. चंद्रपूर जिल्ह्यातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर बल्लारपूर शहरात तणावाची स्थिती आहे. पीडित मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.
काय घडला होता प्रकार?
पीडित मुलीच्या आत्महत्येमागे बलात्कार हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. 2 सप्टेंबरच्या रात्री पिडितेवर तिच्या मित्राने बलात्कार केला होता. आरोपी शिवम दुपारे असे त्याचे नाव असून तो 20 वर्षांचा आहे. बल्लारपूर येथील एका लॉजवर नेऊन त्याने पीडितेवर बलात्कार केला होता. या प्रकरणाला वाचा फुटल्यावर सगळीकडे याची चर्चा झालीय
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्रावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्वरित पावले उचलत पोलिसांनी आरोपीला रात्री उशिरा अटक केली.
बदनामीच्या भीतीने आत्महत्या
बलात्काराच्या घटनेनंतर बदनामीच्या भीतीने पीडितेने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीला प्रवेश दिल्याप्रकरणी ओयो हॉटेल मालकावरदेखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली.