आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद (Maharashtra Karnatka Border Dispute) सध्या चांगलाच पेटलाय. पण आता आम्ही दाखवणार आहोत एका वेगळ्याच सीमा प्रश्नाची बातमी. आम्ही दाखवणार आहोत एक घर. जिथं दोन राज्य अगदी गुण्यागोविंदानं नांदतायत. चला तर पाहूया हे अनोखं घर. (chandrapur maharajguda village 10 room house on maharashtra and telangana border see full report)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही आहे एका घराची अनोखी कहाणी. चंद्रपूरच्या महाराजगुडा गावातलं दहा खोल्यांचं हे घर. हे घर चक्क दोन राज्यांमध्ये विभागलेलं आहे, असं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल? नाही ना? पण तुम्ही ऐकलेलं खरं आहे. या घराचा हॉल महाराष्ट्रात, तर किचन चक्क तेलंगणा राज्यात आहे. 



चंदू पवार आणि उत्तम पवार हे दोघे भाऊ सहकुटुंब सहपरिवार या घरात राहतात. या पवार कुटुंबात कसलाही वाद नाही. मात्र हे घर आपल्याच हद्दीत असल्याचा दावा तेलंगणा सरकारही करतं आणि महाराष्ट्र सरकारही. तेलंगणा राज्यानं निश्चित केलेली सीमा या घराच्या बरोबर मधून जात असल्यानं हे घर चर्चेत आलंय. 


एका राज्यातून दुस-या राज्यात जाण्यासाठी इथं ना कुठलं वाहन लागतं, ना चेकनाका. पण ज्या महाराजगुडा गावात ते घर आहे, तिथले ग्रामस्थ मात्र गोंधळात आहेत. तेलंगणात राहावं की महाराष्ट्रात? असा पेच त्यांना पडलाय. दोन्ही सरकारांच्या विविध योजनांचा लाभ गावकरी घेतात. तेलंगणा आणि महाराष्ट्र अशा दोन्ही ठिकाणी मतदानाचा हक्क बजावतात. त्यामुळं पवारांच्या घरात वाद नसला तरी गावात मात्र सीमा प्रश्न कायम आहे.