रायगड : इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी ( Anvay Naik suicide case) अलिबाग सत्र न्यायालयात पोलिसांच्या रिव्हिजन अर्जावरील सुनावणी आता १७ डिसेंबरला होणार आहे. आज या प्रकरणातील आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आपले जामिनासाठीचे अर्ज मागे घेतले. अर्णब गोस्वामींसह ( Arnab Goswami) दोघांवर दोषारोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अलिबाग न्यायालयाने तीनही आरोपींना पोलीस कोठडी नाकारली. त्याविरोधात रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज केला आहे. त्यावरची सुनावणी आज होणार होती. मात्र, त्यासाठी आता न्यायालयाने १७ डिसेंबर ही तारीख दिली आहे . दरम्यान या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध अलिबाग न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यात ६५ साक्षीदारांची नावे नमूद केली आहेत.


आरोपपत्रात रायगड पोलिसांकडने एकूण ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार खटला वर्ग होताना हे आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवले जाईल. तिथे आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडेल, ज्यासाठी अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.


अन्वय नाईक  ( Anvay Naik ) आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी करत रिपब्लिक टिव्हीचे अर्णब गोस्वामी (Republic TV editor-in-chief Arnab Goswami) यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह तपासाची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रायगड पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.