ठाणे : पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही टोळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं पेट्रोल वेंडींग मशिनमध्ये छेडछाड करायची. पेट्रोल वेंडींग  मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला ४ ते ५ टक्के पेट्रोल कमी मिळायचं. त्यामुळे आधीच पेट्रोलचे भाव वाढत असताना ग्राहकांची मोठी फसवणूक व्हायची. 


पोलिसांनी अटक केलेल्या टोळीने फक्त ठाण्यातच नव्हे तर पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या महत्त्वाच्या शहरांतल्या पेट्रोलपंपामध्ये हेराफेरी केल्याचं उघड झालं आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं कारवाईसाठी या शहारांमध्ये रवाना झाली आहेत.