पुणे : मंगळवारी तीन मित्रांचा पुण्यातील जुन्नरमध्ये कारमध्ये जळून मृत्यू झाला. या मित्रांच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या आणखी एका मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच शांतता पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबेगावमध्ये राहणारे संतोष थोरात हे केमिस्ट होते. पुण्यात गाडी पेटल्याने होरपळून मृत्यू झालेल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आळे फाटा येथून ते निघाले. त्याचवेळी संतोष यांनी छातीत दुखत असल्याचं सांगितलं. त्यांना एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. पुढील उपचारांसाठी चाकणला नेलं जात असताना नारायणगाव ते मंचर दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आळे फाटा येथील वडगाव आनंद जवळ स्विफ्ट डिझायर  ही कार  कठड्याला धडकून अपघात झाला. त्यानंतर कारने पेट घेतल्याने आगीत होरपळून तिघांचा जळून मृत्यू झाला. ज्यानंतर आता त्यांच्या चौथ्या मित्राचाही मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे


असा झाला कारचा अपघात


अहमदनगर-कल्याण रोडवर पेट घेतलेल्या कार मध्ये तीन मेडिकल स्टोअर्सच्या मालकांचा होरपळून मृत्यू झाला. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावालगत मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. पुण्याहून परतत असताना नरेश वाघ आणि दिलीप नवले हे प्रशांत चासकर यांच्या घराजवळ पोहचले. मात्र 100 मीटर अंतरावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची स्विफ्ट कार रस्त्यालगतच्या कठड्याला धडकली. गाडीच्या काचा बंद, त्यात एसी सुरु. त्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि गाडीचं इंजिन बंद पडलं. परिणामी सेंटर लॉक ऑपरेट झालंच नाही. त्यामुळं तिघे गाडीतच जळून खाक झाले.