Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election 2024) पडघम लवकरच वाजणार आहे. दिवाळीपूर्वी निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना सर्व पक्ष आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करण्यात सक्रीय आहेत. नेत्यांचे दौरे, आरोप प्रत्यारोप, पक्षामध्ये इनकमिंग आणि आउटगोइंग सुरु आहे. प्रत्येक पक्षाला महाराष्ट्रात आपली सत्ता हवी आहे. अशात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणू असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत केलाय. 


'...तर आम्ही महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे जर आमच्यासोबत आले तर महाराष्ट्रात आम्ही एकहाती सत्ता आणू असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे विधान केलंय.. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलीय. आता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे प्रकाश आंबेडकरांची ही ऑफर स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.



'उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे बंद केलेले नाहीत'


उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करु असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिलीय. मात्र आम्ही कोणाकडे जाणार नाही असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलंय. दरम्यान 'टू द पॉईंट' मुलाखतीत प्रकाश आंबेडकर आणखी नेमकं काय म्हणाले हे शनिवारी रात्री 9 वाजता  झी २४ तासवर पाहता येणार आहे.