मुंबई : ठाकरे सरकारचे मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची 100 कोटी रूपयांची  बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून दावा केला आहे. सोमय्या ट्विट करत म्हणाले, 'ठाकरे सरकारचे मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या100 कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली...' आयकर विभागाने भुजबळांवर कारवाई केली असं देखील सोमय्या यांनी म्हटलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. आता त्यांची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचं सांगितलं जात आहे. 



दरम्यान, शंभर कोटीच्या खंडणीखोरी प्रकरणातील  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डोक्यावर इडी चौकशीची टांगती तलवार आहेच. त्यानंतर आता छगन भुजबळ यांच्याशी संबंधित मध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या केस मध्ये बेनामी प्रॉपर्टी ऍक्‍ट नुसार मालमत्ता जप्त झाल्याने ठाकरे – पवार सरकारच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत.