विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षांचा निकाल लवकरच लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दिलेल्या परीक्षांच्या पेपरची जोरात तपासणी सुरु आहे. लवकरच निकाल (Board Exam Result) लागणार असल्याने शिक्षकांची पेपर तपासण्याची लगबग सुरु आहे. मात्र हे पेपर तपासताना शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये लिहिलेली उत्तर वाचून शिक्षकांनी डोक्याला हात लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या आहेत. त्यात काही विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये असं काही लिहिलं आहे की त्यामुळं पेपर तपासणाऱ्यांना सुद्धा हसू की रडू कळायला मार्ग नाही. बारावीच्या 500 तर दहावीच्या 75 पेक्षा अधिका विद्यार्थ्यांनी असा पराक्रम केला आहे. विद्यार्थ्यांनी उत्तरांऐवजी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. या व्यथा मांडत आम्हाला पास करा अशी विनंती विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे केली आहे. आजवर असे प्रकार ऐकण्यात होते. मात्र आता इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी असे कृत्य केल्याने शिक्षण मंडळ यावर काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


यातील एक विद्यार्थिनीने सर मला कृपया पास करा, नाहीतर बाप लग्न लावून देईल असे म्हणत पास करा म्हणून विनंती केली आहे. दुसऱ्या एका विद्यार्थिनीने तर चक्क दोन पानी निबंध लिहीत मला घरी स्वयंपाक, धुनी भांडी करावी लागतात म्हणून अभ्यास करू शकले नाही. त्यामुळे किमान पास तरी करा अशी विनंती पेपरमध्ये केली आहे. दुसऱ्या एक मुलाने देवा मला पास कर पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकाला सद्बुद्धि दे अस लिहिलं आहे.


धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये उत्तरांच्या जागी हिंदी, मराठी गाणी लिहीलं आहे. तर कुणी भावनिक आवाहान केलं आहे. कुणी थेट पेपरवर नाव लिहिलं आहे. तर कुणी फोन नंबर, तर कुणी उत्तर पत्रिकेचे पान फाडले आहेत. तर काहींनी पेन बदलला आणि शिक्षकाची सही घेतलेली नाही. हा सर्व प्रकारानंतर निकाल लवकर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना नस्ता मनस्ताप सहन करावा लागत आहे.


दरम्यान,  अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आता बोर्डाने चौकशी साठी बोलावलं आहे. त्यानंतर नियमानुसार या विद्यार्थ्यांवर कारवाई सुद्धा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या संभाजी नगर, जालना,बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातील हे विद्यार्थी आहेत.