Chhatrapati Sambhaji Nagar News : मागच्या कित्येक दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकुळ घातलाय. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढलाय. तरीदेखील ऐन पावसाळ्यात संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहराला पैठणहून जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. या धरणात मुबलक पाणी असूनसुद्धा संभाजीनगरच्या तोंडचं पाणी पळालं आहे. दरम्यान शनिवारी अचानक शहराचा पाणीपुरवठा बंद पडला ही नेमक काय हे शोधताना सगळ्यांनाच अचंबीत करणारं कारण समोर आलं.चक्क एका सापामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा आज खंडित झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक सापाने संभाजी नगरच्या नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवलंय.. जायकवाडी येथील पंपहाऊसच्या फीडरमध्ये शनिवारी दुपारी धामण साप शिरला.. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन पंपहाऊस बंद पडलं.. तब्बल चार तास पाणी उपसा बंद होता.. याचा फटका शहरातील आजच्या पाणी पुरवठ्यावर झालाय.. शहरातील काही भागातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे.. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय. (Chhatrapati Sambhaji Nagar today 23 july water supply cut after Dhamana snake entered pump house at Jayakwadi maharashtra News )



गेल्या वर्षीही अशी घटना घडली होती. त्यावेळी जायकवाडीमधील पंप हाऊमध्ये उंदीर शिरल्यामुळे संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा झाला नव्हता. या उंदिरांमुळे स्पार्किंग होऊन पंप हाऊमध्ये बिघाड झाला आणि संपूर्ण यंत्रणा बंद पडली होती. त्याचा परिणाम म्हणून जायकवाडीहून होणारा पाणीपुरवठा तब्बल 11 तास बंद राहिला होता. (aurangabad water management)