पुणे : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर राज्यांच लक्ष वेधलं आहे. उदयनराजे भोसलेंनी राजकारणासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं सुरूवातीलाच स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांची 'जाणता राजा' नावाने तुलना केली जात असे. यावर उदयनराजेंनी आक्षेप घेतला आहे. उदयनराजेंनी नाव न घेता टीका केली आहे. जाणता राजा ही उपमा कुणी दिली? असा सवाल उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत विचारला आहे. (शरद पवारांना 'जाणता राजा' म्हटलेलं कसं चालतं?) 


कुणालाही जाणता राजा म्हणतात, असा राग उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. एवढंच नव्हे तक 'जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच आहेत. तसेच कुणाशीही महाराजांची तुलना होऊ शकत नाही', अशा कडक शब्दात उदयनराजे भोसलेंनी टीका केली आहे. 


'जाणता राजा' So called कुणी उपमा दिली काय माहित?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला. घड्याळ्यांची वेळ आता संपली आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेवर आणि संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. 'शिवसेना हे नाव बदलून ठाकरे सेना असं नाव ठेवा', असं उदयनराजे भोसले म्हणाले. तसेच 'महाशिवआघडीमधून शिव हे नाव का काढण्यात आलं?' असा सवाल देखील उदयनराजेंनी यावेळी विचारला. 


शिवरायांची तुलना अनेकदा पाहायला मिळते. महाराजांनी तुलना कुणाशीही होऊ शकत नाही . तसेच उदयनराजे यावेळी 'आज के शिवाजी' या पुस्तकावर देखील बोलले. पुस्तकातील मजकुरामुळे वाईट वाटलं, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच दुसऱ्या बाजूला बुद्धी गहाण ठेवली आहे का ?असा सवाल देखील त्यांनी यावेळा विचारला?