औरंगाबाद : राफेल विमान खरेदीचा सौदा काँग्रेसला फायदेशीर नव्हता म्हणून ते खरेदी लांबवत होते. या घोटाळ्यातील मोठा पत्रव्यवहार समोर आला आहे. दलालांना मोकळे रान होते. काँग्रेस हा दलाल आहे आणि या दलालांच्या हाती पुन्हा सत्ता नको. युवकांनी हा निरोप घराघरात पोहोचवला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय लक्ष्य 2019 या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्सन केले. यावेळी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल केला. येणारी निवडणूक आपल्याला संघटनेच्या ताकदीवर, युवांच्या साहाय्याने जिंकायची आहे. जो पक्ष युवांच्या जवळ पोहोचेल तोच जिंकेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.


तीन राज्यांच्या निवडणुकानंतर काही लोकांना पीस फुटली आहेत. काहींना जग जिंकण्याचा आनंद होत आहे. ते ठिक आहे. त्यांचं चालू द्या, मात्र यावेळी येणाऱ्या निवडणुका आपण आता अजून जोमाने जिंकू. अंगाला पिसे लावून उडणाऱ्यांना लोकसभेत 100 जागा सुद्धा मिळणार नाही, याची मला खात्री आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.


राफेल राफेल करत आहात, किती खोटे बोलणार? अहो न्यायालयानेही सत्य सांगितले आहे. दलाली करण्यात काँग्रेसने जन्म घालवला आणि आता तेच ओरड करत आहेत. राफेल विमान खरेदीचा सौदा काँग्रेसला फायदेशीर नव्हता म्हणून ते खरेदी लांबवत होते. या घोटाळ्यातील मोठा पत्रव्यवहार समोर आला आहे. राफेल म्हणजे काँग्रेसचे कव्हर फायर आहे. कारण त्यांना माहीत होतं अगस्ता वेस्टलँडमध्ये त्यांची पोलखोल होणार म्हणून
इटालियन बाईचा मुलगा, ही डील पूर्ण करणार आहे, असं पत्र इटलीच्या एजन्सीने जप्त केले आहे, असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.