Maharashtra - Karnataka Border Dispute : अनेक वर्ष प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आता निर्णयाक वळणावर येऊन पोहचला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Union Home Minister Amit Shah) यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली.  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी वाद घालू नये सीमावादाला राजकीय मुद्दा बनवू नये असे आवाहन ठाकरे गटासह महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष आणि विशेषत: विरोधकांना केले आहे. अमित शाह यांच्या अवाहानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेतली. आगीत तेल ओतण्याचे काम करु नये असा इशारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शहा यांच्या सूचनेनुसार दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  या प्रश्नी दखल घेतल्याबद्दल अमित शाह यांना धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो असेही शिंदे म्हणाले.  


कर्नाटक आणि महाराष्ट्रात ज्या घटना होत होत्या त्या पार्श्वभूमीवर मराठी जनतेवर कोणताही अन्याय होऊ नये अशी भूमिका आमची होती. गृहमंत्र्यांनी शांततेचं वातावरण निर्माण करण्याच्या सूचना दोन्ही राज्यांना दिल्या आहेत.  कर्नाटक सरकारनंही ते कबूल केल असल्याचे शिंदे यांनी सांगितले.