नंदूरबार :  मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. मुख्यमंत्री सध्या नंदूरबार (Nandurabr) दौऱ्यावर आहेत. बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाचं उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) पहिलाच मेळावा नंदुरबार येथे पार पडला. मुख्यमंत्र्यांनी या जाहीर सभेत शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे शिंदेंनी यावेळेस उपस्थितांची राजकीट टोलेबाजी न करता अहिराणी बोलून मनं जिंकली. तसेच मुख्यमंत्र्यांनी खानदेशातील लोकांचं कौतुक केलं. (chief minister eknath shinde give speech in ahirani at nandurbar)


मुख्यमंत्री काय म्हणाले?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कसा शेतस बठ्ठा? दिवाई कशी गई? जोरमा? खान्देशना लोकं पक्का दिलदार शेतस. मूठभर लेतस आनि तगारीभर देतस", अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अहिराणीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांची मनं जिंकली. तसेच नंदुरबारवासियांनीही टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छाचं स्वागत केलं. 'खान्देशची लोकं मोठी दिलदार असतात. मूठभर घेतात आणि घमेलीभर देतात', मुख्यमंत्र्यांनी ही वाक्य अहिराणीत म्हणत उत्तर महाराष्ट्रातील लोकांची मनं जिंकली.


"सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार"


"राज्यात गेल्या 3 महिन्यात कामं झाली ती आतापर्यंत कधीच झाली नाहीत. मिळालेल्या संधीचे सोने करणार. काम करणारे लोक आहोत. जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासुन लोकांचा प्रतिसाद मोठा मिळत आहे. लोकांच्या मनातले सरकार स्थापन केले आहे.  सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे", असंही शिंदे म्हणाले.