विरोधी पक्षनेतेपदासाठी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला अट
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस विधानसभेती विरोधी पक्षनेत्याविना पार पडला. विरोधी पक्षांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांचे नाव जाहीर करावे अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना कालच दिले आहे. मात्र आज अध्यक्षांनी त्याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हवे असेल तर विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक जाहीर करावी अशी अट मुख्यमंत्र्यांनी टाकली असल्याचे समजते. ही अट ठेवून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांची कोंडी केली आहे. याबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं आहे.