हेमंत  चापुडे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील(Pune) माजी सरपंचाच्या मुलाचा लग्न सोहळा सुरु होता. मात्र, या लग्नात अचानक पोलिसांची एन्ट्री झाली. मंडपात एकच गोंधळ उडाला. वऱ्हाडी देखील कन्फ्यूज झाले. सरपंचाच्या मुलीचा विवाह एका अल्पवयीन मुलीसह(child marriage) करण्यात येत होता.याची माहिती मिळताच पोलिसांनी विवाहस्थळी दाखल होत हा विवाह सोहळाच उधळून लावला. तसेच वधु-वराच्या आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे. 


सरपंचाच्या मुलाचा विवाह दहावीत शिकणाऱ्या मुलीशी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औद्योगिक क्रांती घडत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील सणसवाडी येथे हा बालविवाह होतहोता. विशेष म्हणजे माजी सरपंच महिलेच्या मुलाचा विवाह  इयत्ता दहावीत शिकणा-या मुलीसह होत होता.


पोलिसांनी हा बालविवाह रोखला. या प्ररकरणी शिक्रापुर पोलीसांत माजी सरपंच महिलेसह नवरदेव मुलगा मुलीच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.


औद्योगिक करणाचा विस्तार होऊन विकास क्रांती होत असताना समाजात आजही बालविवाहच्या प्रथा अजुनही रुढच आहेत.  असाच प्रकार थेट माजी सरपंच महिलेच्या मुलानेच केलाय.
गावचा कारभार हाकणा-यांनीच जर बालविवाह सारख्या प्रथा रुढ ठेवल्या तर इतरांचे काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.