Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा मावळ येथे आहे.  अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधला. मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. लाडकी बहीण पुन्हा एकदा अजित पवारांनी भाष्य केलं होतं. तर, त्याचवेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मावळ येथील जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी म्हटलं आहे की, हात जोडून सांगायचंय की, मुलं बाळ होतात देवाची कृपा अल्लाची कृपा म्हणतात. पण काही देवाचीवगैरे कृपा नसते. नवऱ्याची कृपा असते म्हणून पोर बाळं होतात. कृपा करुन दोन मुलांवरुन थांबा. कृपा करून दोन मुलांवर थांबा. दोन मुलांवर थांबलात तर अधिक योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना शिकवता येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


मावळमध्ये  मागासवर्गीय समाज आहे. लहान कुटुंब ठेवलं तर या योजनांचा आधिक फायदा तुम्ही घेऊ शकता. त्या दोन मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देऊ शकाल. चांगल्या पद्धतीने सांभाळ करु शकता. त्याचबरोबर तुम्हीदेखील चांगलं जीवन जगू शकता. आम्ही बाकीच्या बाबतीत 80 कोटी लोकांना भारतात मोफत अन्नधान्य देतो. हे जनसन्मान योजनेच्या माध्यमातून याच महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


'भाऊ ओवाळणी टाकतो ती परत घेत नसतो. त्यामुळे विरोधक जे सांगत आहेत पैसे परत घेणार आहे. तर अस काहीही होणार नाही. पुणे जिल्ह्यातील महिलांना उद्या पैसे जमा होणार आहेत. ते पैसे तुमचे आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. महिलांनी आशीर्वाद दिले. महायुती मधील जिथे जिथे उमेदवार असतील त्यांना मतदान करा.. म्हणजे ही योजना कायमची सुरु ठेवता येईल, असं अवाहनदेखील अजित पवारांनी केलं आहे.


अजित पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


- 'गुप्तचर विभागाने मला सांगितले की दादा तुमच्या जीवाला धोका आहे. मात्र या माय माऊलीने दिलेला धीर  महत्त्वाचा आहे. या माय माऊली माझ्यासोबत असल्यामुळे मला कुठल्याही पद्धतीची इजा होऊ शकत नाही.'


- 'गरीब कुटुंबातील अनेक मुलींना शिक्षण घेता येत नाही. महाराष्ट्रामधील सर्व जाती धर्मातील महिला मुलींना मोफत शिक्षण सुरू केले. मुलींची सर्व फी राज्य सरकार भरेल.'


- 'वर्षातून 3 गॅस सिलेंडर चे पैसे खात्यात जमा होणार.'


- '44 लक्ष शेतकऱ्यांना वीजबिल माफ केले आहे. हा निर्णय राज्यसरकारने घेतला'