विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण... दिव्यांचा सण.. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आणि काही अनाथ मुलं पुढं आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, अनाथ मुलं तुमच्या आमच्या आयुष्यात आनंद या माध्यमातून आनंद आणण्याचा प्रयत्न करतायत. रंगीबेरंगी असे एक हजारावर आकाश कंदील त्यांनी तयार केलेत. 'झी २४ तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी या मुलांच्या शाळेला भेट दिली त्यावेळी स्वकष्टातून पैसे कमवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार या मुलांनी ध्यास घेतला आणि आपल्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला.


या मुलांना मदत करण्यासाठी औरंगाबादची काही तरुण मंडळी आणि त्यांच्या संस्था पुढे आल्यात. संस्थेनं त्यांना आकाश कंदील बनवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि सोबतच आकर्षक कंदिलांना बाजारपेठ मिळवून देण्याचीही तयारी दर्शवलीय.


आपणही हे कंदील विकत घेऊन या चिमुरड्यांच्या प्रयत्नांना नक्कीच साथ देऊ शकतो. प्रेक्षकहो, तुमचा हा प्रयत्न त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा देऊ शकतो. तेव्हा आपणही एक पाऊल पुढे येत मुलांना साथ देऊयात आणि त्यांची दिवाळी आनंदी करुयात...