मुंबई : संपूर्ण देश सध्या कोराना विषाणूच्या संकटाशी लढा देत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या लाटेमुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही जास्त रुग्णं संक्रमित झाले आहेत. तसेच या दुसऱ्या लाटेमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. कोणी आपली आई गमावली, तर कोणी आपलं मुलं. कोणी भाऊ गमावला तर, कोणाच्या बायकोने आयुष्यातील साथ सोडली. अशात लोकांनी आपल्या जवळच्या कुटूंबीयांची काळजी घेणे आणि त्यांचे मनोधैर्य उंचावणे जास्त गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण कोरोनाने किंवा कोणत्याही आजाराने माणूस खचतो, त्यामुळे त्याची मानसिक परिस्थिती सुधारण्यावर लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे. असाच एक काळजी करणारं आणि धीर देणारं पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झालं आहे.


हे पत्र पाहिल्यावर लोकांचे डोळे पाणावले. हे पत्र लहान मुलांनी आपल्या आईसाठी लिहले आहे. त्यांच्या आईला कोरोना झाला असल्याने ती रुग्णालयात भरती आहे.


त्यामुळे ते आपल्या आईला भेटू शकत नाहीत किंवा तिच्याशी बोलूही शकत नाही. परंतु त्यांनी आईशी बोलण्यासाठी आणि तिचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एक मार्ग शोधला आणि हे पत्र लिहले.



मुलांनी या पत्रात लिहिले, 'आई आम्ही खाली आलो आहोत, तुझी तब्येत आता सुधारली आहे, आम्ही तुला घेऊन जाऊ, तु टेन्शन घेऊ नकोस. मुनमुन, बुलबुल, गुडिया, विकास' हे पत्र वाचून अनेक लोकं भावूक झाले तर अनेकांना आपले अश्रू अनावर झाले आहे.


या मार्फत मुलांनी जणू काही असा संदेश दिला आहे की, कोरोना आमच्या आईला शरीराने दूर करु शकतो परंतु मनाने नाही.


पत्र सोशल मीडियावर व्हायरल


हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केले आहे. पत्र शेअर करताना त्यांनी लिहिले, 'सर्वात सुंदर पत्र'. आता हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.


या पत्राला 43 हजार लोकांनी लाईक केले आहे. तसेच चार हजाराहून अधिक लोकांनी त्याला रीट्वीट देखील केले आहे. इतकेच नाही, तर लोकं या पत्रावर हृदयस्पर्शी कमेंट्स ही देत आहेत.