रत्नागिरी समुद्रात चीनची १० जहाजे थांबवली
रत्नागिरीत चीनची १० जहाजे थांबविण्यात आली आहेत.
रत्नागिरी : मान्सून दाखल होण्याआधी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. तसेच सोमवारी रत्नागिरी किनारपट्टीवर वादळी पाऊस झाला. अचानक वादळी वाऱ्याचा जोर वाढल्याने समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वारे तीशी ५० ते ६० किमी वेगाने वाहत आहेत. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा तडाखा चीनच्या १० जहाजांना बसण्याची शक्यता लक्षात घेऊन ही सर्व जहाजे रत्नागिरीच्या किनारी सुरक्षीत ठिकणी थांबविण्यात आली आहेत.
वायू चक्रीवादळामुळे रत्नागिरीत चीनच्या दहा जहाजांना थांबण्याची परवानगी देण्या आली आहे. त्यामुळे चिनी जहाजे थांबविण्यात आल्याचे माहिती कोस्टगार्डने दिली आहे. दरम्यान, हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे वायू वादळाचा परिणाम रत्नागिरी किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. काल सोमवार पासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचा जोर आज अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामूळे समुद्रात वादळ सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे.
समुद्राच्या अक्राळ-विक्राळ लाटांनी हाहाकार माजवला आहे. अजस्त्र लाटा आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ यामुळे गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, मिऱ्या, मुरुड आणि हर्णे भागात काही ठिकाणी समुद्राच्या लाटांनी शिरकाव केला. वादळ सदृश्य परिस्थितीमुळे मच्छीमारांनी आपल्या होड्या सुरक्षीत ठिकाणी हलविल्या आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू वादळाचा फटका मॉन्सूनच्या आगमनावर झाला आहे.
गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, सोमवारी सायंकाळपासून किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याचा जोर वाढला आहे. या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागाला बसत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून, समुद्र खवळला आहे. यामुळे किणार्यावर समुद्री लाटांचे रौद्ररूप दिसून येत आहे.