महाराष्ट्रात रस्ते की चाळण? खड्डे पाहूनच परदेशी कंपनीला भरली धडकी, गुंतवणूक न करताच माघारी
शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक आणि रस्त्यांवरून दैनंदिन प्रवास करणारे हजारो नागरिक सातत्याने पालिकेकडे अर्ज करत आहेत. त्यातच आता ऑरिक सिटीमुळे (Auric City) जागतिक चर्चेत असलेले औरंगाबाद (Aurangabad ) शहरात देखील खड्ड्यांचे सामाज्र पाहायला मिळत आहे
Aurangabad : शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक आणि रस्त्यांवरून दैनंदिन प्रवास करणारे हजारो नागरिक सातत्याने पालिकेकडे अर्ज करत आहेत. त्यातच आता ऑरिक सिटीमुळे (Auric City) जागतिक चर्चेत असलेले औरंगाबाद (Aurangabad ) शहरात देखील खड्ड्यांचे सामाज्र पाहायला मिळत आहे.
धक्कादायक म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन (Bidkin) येथे जागा पाहण्यासाठी आलेले चिनी (china) उद्योगांचे पथक हे पैठण रस्त्यांवरील खड्डे पाहून अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरल्यामुळे औरंगाबादची मोठी नाचक्की झाली आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत स्थापन केलेल्या या ऑरिकमध्ये (Aurangabad Industrial City ) औद्योगिक भूखंड वाटपातून तब्बल 81 कोटी 28 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. दिल्ली- मुंबई कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक सिटी (Auric City) उभारण्यासाठी एकूण 10 हजार एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात शेंद्रा आणि बिडकीनमध्ये उद्योग विकासाचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे आगामी काळात सर्वच उद्योगांना बिडकीनमध्ये जागा देण्याचे नियोजन आहे.
याचपार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी चीनमधील एक कंपनीचे पथक गुंतवणुकीसाठी औरंगाबादमध्ये आले होते. हे पथक बिडकीन येथे जागा पाहण्यासाठी पैठण रस्त्यावरून बिडकीन येथे जाणार होते. मात्र औरंगाबाद शहरातून पैठण रस्त्यावरून बिडकीन (Bidkin) येथे जाण्यासाठी पथक निघाले असताना रस्त्यात वाहतुकीची कोंडी, रस्त्याची अवस्था पाहून जमीन न पाहताच बिडकीन येण्यापूर्वीच त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
वाचा: तुम्ही Corona Positive की Negative? मोबाईलच सांगणार, कसं ते अधिक जाणून घ्या
पाच मंत्री असलेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था
औरंगाबाद-पैठण (Aurangabad-Paithan) रस्त्याच्या चौपदरीकरणाचा (quadrupling) मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. या कामाचे अनेकदा उद्घाटने झाली पण प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात दोन केंद्रीय आणि राज्यातील सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र असे असतांना शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न काही मार्गी लागतांना दिसत नाही. औरंगाबाद-पैठण रस्ता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघातील असूनही, रस्त्यांवरील खड्डे आणि चौपदरीकरणाचा मुद्दा कायम आहे. मात्र यापूर्वी सुद्धा अनेकदा असे उद्घाटन सोहळे पार पडल्यानंतरही रस्ता बनला नसल्याने, आतातरी हा रस्ता होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.