नाशिकमधील चायनीज भाजीपाल्याचा डंका
नाशिकच्या (Nashik) एका शेतकऱ्यांने (Farmers) दलाल व्यापारी टाळून थेट महानगरांमधील हॉटेल्समध्ये आपला भाजीपालाच्या माल (vegetables) विकण्यास सुरुवात केली आहे.
योगेश खरे / नाशिक : सध्या बाजार व्यवस्था मुक्त करणाऱ्या कृषी कायद्यावरून रणकंदन सुरू आहे. हे कायदे रद्द करावे म्हणून शेतकऱ्यांचा आंदोलनही (farmers protest) सुरू आहे. मात्र हे कृषी कायदे होण्यापूर्वी नाशिकच्या (Nashik) एका शेतकऱ्यांने (Farmers) दलाल व्यापारी टाळून थेट महानगरांमधील हॉटेल्समध्ये आपला भाजीपालाच्या माल (vegetables) विकण्यास सुरुवात केली आहे. याचा या शेतकऱ्याला फायदा होत आहे. हे कुटुंब आहे कळमकर कुटुंब. गेल्या पाच पिढ्यापासून शेती हाच व्यवसाय. अनेक वर्षे द्राक्ष शेती केली. मात्र निसर्गाच्या बेभरवश्याने अनेक वेळेस कर्जबाजारी होण्याची वेळ आली. शाश्वती नसल्याने त्यांच्या मुलांनी चायनीज भाजीप्ल्याची शेती करण्याचे ठरविले. यात लेट्युस, ब्रोकोलो, सेलेरी, बेझील काही रोपे मिळवून त्याची रोपवाटिका तयार केली आणि सुरु केले ते उत्पादन.
नाशिक शहरात याला भाव मिळत नसल्याने अखेर मुलांनी मुंबई गाठले. आज मुंबईतील बहुतांशी मोल्स हॉटेल्सला त्यांच्या भाजीपल्याचा (Chinese vegetables) पुरवठा होत आहे. वडिलधारी मंडळी आणि घरातील महिला मजुरांच्या सहाय्याने ही शेती करत आहेत. आज यातील ऐंशी प्रकाराच्या चायनीज भाजीपाल्याची शेती ते करत आहेत. शेतीतील सर्व समस्या आणि अडथळे त्या पार केले आहेत. तुलनेत या शेतीत कमी रोगराईचे धोके असून उत्पादन मुबलक मिळत आहे. त्यामुळे या शेतीतील सर्व प्रकार मोठ्या उत्सहाने जुन्याजाणत्या पिढीने आनंदाने स्वीकारले आहेत.
शेतकरी (Farmers) नेहमीच आपले उत्पादन बाजारसमितीत नेऊन विकतो. त्यामुळे त्याला मिळतो कमी भाव मात्र त्याला मिळणाऱ्या भावापेक्षा बाजारात भाव किमान तिप्पट असतो. बाजारसमिती आणी ग्राहक यांच्यातील दुवे आणि बारकावे जाणून घेत पकेजिंग, प्रिंटींग मार्केटिंग आणि सेल्स अशी सर्व कौशल्ये त्यांच्या पुढच्या पिढीने आत्मसात केली आहेत.
परिणामी आज अनेक मोल्स फूड चेन्स आणि फ़ाइव्ह सटार हॉटेल्स त्यांचे ग्राहक बनले आहेत. कुटुंबातील एक भाऊ आता हा व्यवसाय सांभाळतो तर एक भाऊ मुम्बाईतिल बाजार आणि तेथील विक्री व्यवस्था पुरवठा बघतो. तर त्यातील दुसरा चुलत भाऊ पुण्यातील बाजारपेठेकडे लक्ष देत आहे. मुंबईची परसबाग म्हणून नाशिकची ओळख सर्वत्र आहे. मात्र राज्यपरराज्यातील फ़ाईव्ह स्टार हॉटेल्स आणी फूड चेनची परसबाग हि नाशिक होते आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबाने आपलाच शेती व्यवसाय याच पद्धतीने पुढे नेत शेती फायद्यात आणण्याची गरज आहे.