मुंबई : Chipi Airport Dedication Ceremony: आज कोकणवासियांचं विमानाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चिपी विमानतळाचे आज उदघाटन होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाला हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि राणे यांच्या उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ( Chipi Airport will be inaugurated by Chief Minister Uddhav Thackeray today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज चिपी विमानतळाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि राणे एकाच मंचावर असणार आहे. आज दुपारी 1 वाजता चिपी विमातळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार होते. मात्र आता ते ऑनलाईन हजेरी लावणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर शिवसेनेच वर्चस्व दिसणार आहे. कारण याआधी शिवसेना आणि भाजपमध्ये विमानतळाच्या श्रेयावरुन चढाओढ दिसून येत होती.
 
चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचा लोकार्पण सोहळा होईल. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे सकाळी 11 वाजता मुंबईतून विमानाने रवाना होणार आहेत.