खंडणी प्रकरणात सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरणागतीआधी व्हिडिओ पोस्ट करत आपण निर्दोष असल्याचं वाल्मिकने सांगितलं होतं. मात्र आता वाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील एका मोठा आणि महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती लागला आहे. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे. कारण वाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील एक महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती लागला आहे. आतापर्यंत वाल्मिक कराड पवनचक्की प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा करत होता. पण आता खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णू चाटेने सीआयडीला माहितीमुळे वाल्मिकच्या अडचणी वाढल्या आहेत. 


वाल्मिक कराड आणि पवनचक्की कंपनीच्या अधिका-यांचं फोनवरून संभाषण झालं होतं, अशी मोठी कबुली चाटेने दिली आहे. सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. वाल्मिकने विष्णू चाटेच्या फोनवरूनच धमकी दिल्याची तक्रार कंपनीच्या अधिका-यांनी दिली होती. याच बाबत चाटेनं दोघांचं बोलणं झाल्याची कबुली दिली आहे. 



- बीडमधील खंडणी प्रकरणातील महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती


- वाल्मिकने पवनचक्की अधिकाऱ्यांशी माझ्या मोबाईलवरून संभाषण केलं


- वाल्मिकने माझ्याच फोनवरून पवनचक्की अधिकाऱ्यांना धमकी दिली


- चाटेच्या फोनवरून वाल्मिकने धमकी देली होती - पवनचक्की अधिकरी


- अहवाल सीआयडीकडून न्यायालयात सादर


- चाटेच्या कबूलीनंतर वाल्मिकच्या भोवती फास आवळला



आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत असतानाच या प्रकरणाचा संबंध संतोष देशमुखांच्या हत्येशी जोडण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे याच खंडणी प्रकरणातील नंतरच्या घडामोडींमध्ये आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली आहे. वाल्मीकने खंडणीसाठी दिलेल्या धमकीपासून हत्येपर्यंतच्या घटना परस्परांमध्ये गुंतलेलेल्या आहेत. त्यामुळे वेगात तपास करत वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकऱणात लवकरात लवकर सहआरोपी करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.