cidco lottery 2024 : सिडोको लॉटरीच्या सोडतच्या आधी एक विचित्र प्रकार घडला आहे. लॉटरीची सोडत होण्याच्या 10 मिनिटे आधी  सिडकोचे वेबसाईट अचानक बंद पडली. यामुळे अर्जदार चांगलेच संतापले. उलवे नोड मधील  243 दुकानांच्या लॉटरीवेळी हा प्रकार घडला. सोडत पुन्हा काढम्याची देखील मागणी केली जात आहे. 


सिडकोचे वेबसाईट दहा मिनटं आधी पडली बंद  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 मे रोजी उलवे नोड मधील  सिडकोने बांधलेल्या  243 दुकानांची  ई  प्रणाली द्वारे लॉटरी  होती.  परंतु लॉटरी जाहीर होण्याच्या वेळे अधीच सिडकोची  वेबसाईट 10 मिनटं आधी  बंद  पडली. यामुळे ज्या  ग्राहकांनी   लॉटरी  मधून दुकान खरेदीची बोली लावण्याचे सुरू  होते  त्याचवेळी  दहा मिनटं आधी वेबसाईट बंद पडली. यात शेवटच्या क्षणाला जास्तीत जास्त बोली लावली जाते. यावेळी वेबसाईट बंद पडली.  यामुळे अनेक बोली  लावलेल्या ग्राहकांची निराशा झाली.  


ऑनलाईन सोडत प्रणालीचे हे काम सिडकोने  खाजगी  कंपनीला दिले आहे. यामुळे यावर सिडकोने कारवाई करावी तसेच पुन्हा लॉटरी घ्यावी अशी मागणी  ऑक्शन मध्ये सहभागी झालेल्या ग्राहकांनी केली आहे.  दहा मिनटं आधी वेबसाइट बंद झाल्याने यात काळा बाजार झाल्याचा आरोप केला जात आहे. लॉटरी पुन्हा घेण्याची मागणी केली आहे याबाबत सिडको कडे विचारणा केली असता सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेपर्यत वेळ होती यामुळे वेबसाईट आधी बंद पडली आहे का? किंवा काही तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे का याबाबत माहिती घेत असल्याचे सिडको जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी सांगितले.