धुळे : धुळे महापालिकेच्या आवारात फ्रीस्टाईल हाणामारी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवपुरातले काँग्रेस नगरसेवक आणि माजी उपमहापौर इस्माईल पठाण यांच्या तीन मुलांनी तौफिक खाटिक या नागरिकाला मारहाण केली. 


वॉर्डातली समस्या सोडवली जात असताना ही तक्रार सोशल मीडियावर वायरल का केली? याचा जाब विचारत नगरसेवक इस्माईल पठाण यांच्या मुलांनी तौफिकला मारहाण केली. 


विशेष म्हणजे, यावेळी पोलीस कर्मचारी महापालिकेत उपस्थित होते. या प्रकरणी कुठलाही गुन्हा किंवा तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली नाही.