मुंबई / रायगड : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. (unseasonal rain in Raigad district) तर मुंबईत दादर, वरळी, वडाला या भागातही रात्री तुरळक पाऊस (Rain) झाला. राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आजपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



रायगड ( Raigad ) जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस (Rain) सुरु झाला आहे. अलिबाग ते पोलादपूर या सर्वच तालुक्यात रिमझीम पावसाची हजेरी आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस पडत आहे. पावसाचा आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.