औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्यातही मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले. 


मंत्रिमंडळाचे संकेत जरी मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी यात कुणाचा समावेश करण्यात येणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता. त्याआधारे मंत्रिमंडळातून कोणाला वगळायचे आणि कोणाला संधी द्यायची हे ठरवलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.


दरम्यान नारायण राणेंची भाजपमध्ये एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसात उधाण आलं आहे. त्यामुळे दसऱ्यापूर्वी सिमोल्लंघन करणाऱ्या राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.