नागपूर : एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॉलीवूडच्या एका गाण्यामुळे कोंडी झाली, हसता ही येईना, आणि बोलता ही येईना अशी परिस्थिती सुरूवातीला मुख्यमंत्र्यांची झाली.


बॉलीवूडच्या गाण्यांमुळे कोंडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आलेल्या अडचणीला तोंड देणार नाहीत, तर देवेंद्र फडणवीस कसले?, असे बोलण्यात कसलेले मुख्यमंत्री शेवटी म्हणाले, 'देणार देणार, जो वादा केला आहे, तो पूर्ण करणार...खोटे वादे कधी करणार नाही'


'क्या हुआ तेरा वादा'


धनगर आरक्षणावर जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत असताना, क्या हुआ तेरा वादा, असं गाणं लावण्यात आलं, तेव्हा यावर समोर उभे ठाकलेले मुख्यमंत्री, काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं, मुख्यमंत्री गालातल्या गालात हळुच हसल्याने, मुख्यमंत्र्यांना गाण्याचा नेमका अर्थ गवसलाय, हे लक्षात आल्यानंतर, समोरासमोर उभ्या असलेल्या लोकांनाही हुरूप आला आता मुख्यमंत्री काय बोलतील?


अखेर मुख्यमंत्री म्हणाले,


'देणार देणार, जो वादा केला आहे, तो पूर्ण करणार... खोटे वादे कधी करणार नाही'