COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : नाणार प्रकल्पावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण पेटलंय. शिवसेनेच्या आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिली तर नारायण राणे यांनीही सरकारला याप्रकरणी धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रीया समोर येत आहे. नाणारला होणारा विरोध गैरसमजातून आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी म्हटले आहे. नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणार ही भाग्याची गोष्ट आहे. आपण चर्चेतून प्रश्न सोडवू असे त्यांनी म्हटलंय. नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत अबू धाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक करार झाला आहे. या कराराला थांबवण्याऐवजी गती देण्याचे काम केंद्राकडून जोरात सुरू आहे. केंद्राने जरी नाणारला मंजुरी देण्यासाठी करार करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी कोणताही करार होऊ शकणार नाही. तसंच महाराष्ट्रात हा प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.


उद्योग मंत्री अंधारात 


हा करार करतांना मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना अंधारात ठेवले. याबाबत निषेध -विरोध हा मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या पुढे नोंदवला आहे. उद्या मुख्यमंत्री-उद्योगमंत्र्या बैठक होणार असून  त्यात याबाबत चर्चा होईल अशी प्रतिक्रीया दिवाकर रावते यांनी दिलीय.


राणेंची नाराजी


माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे संस्थापक  खासदार नारायण राणे हे आक्रमक झाले आहेत. वेळ पडल्यास राजीनामा फेकून देईन आणि नाणारला एकही दगड रचू देणार नाही, अशा इशारा राणे यांनी दिला आहे.