अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिलदार विरोधक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा, असं सांगत फडणवीसांनी नाव न घेता शिवसेनेलाही टोला हाणला आहे.


शरद पवारांच्या राजकीय आणि संसदीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमरावतीमध्ये त्यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. शहर आणि जिल्ह्यातल्या सर्व राजकीय नेत्यांनी मिळून या सोहळ्याचं आयोजन केलं होतं.


या कार्यक्रमाला आनंद अडसूळ, गृहराज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मात्र कार्यक्रमाला प्रकृती अस्वस्थामुळे अनुपस्थित राहिलेत.



सत्काराला उत्तर देताना पवारांनी आपले आणि अमरावतीचे जुने संबंध असल्याचं पवार म्हणाले.