नवी मुंबई : मेट्रोतून प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रोच्या रंगीत चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मेट्रो कारशेडपासून ते पेंधर स्थानकापर्यंत पहिल्यांदाच ही रंगीत चाचणी घेण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडकोतर्फे बेलापूर ते पेंधरदरम्यान, ११ मेट्रो स्थानके उभारण्यात आली आहेत. ११.१० किमीचे अंतर असून चार मार्गिकांचा यात समावेश आहे. या प्रकल्पासाठी जवळपास ८ हजार ९०४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तसेच ११ स्थानकांसाठी ३०६३ कोटी रुपये खर्च आला आहे.


मेट्रोच्या या मार्गावर २१ उन्नत स्थानके आणि एक डेपो वर्कशॉप असणार आहे. तसेच एमएमआरडीएमामार्फत कल्याण-डळोजा मार्ग प्रस्तावित आहे. तर नवी मंबईतील मेट्रो प्रकल्पाअंतर्गत तळोजा पाचानंद येथे सुमारे २० हेक्टर जागेवर मेट्रो डेपो कार्यशाळा असणार आहे. येथून नियंत्रण कक्ष, रेल्वे स्वच्छता केंदर, रेल्वे गाडी विसावा जागा, प्रशिक्षण केंद्र आदी सुविधांचा यात समावेश असेल.