नांदेड : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून कधीही निवडणूकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे पक्षाने आपआपल्या कार्यकर्त्यांची मोटबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. युती आणि आघाड्यांनाही जोर आला आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. तर आपआपसातली भांडण विसरून सेना-भाजपने हातात मिळवला आहे. आपले विरोधक कोण आहेत हे स्पष्ट झाल्यावर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना देखील सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना टोला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधक सध्या नरेंद्र मोदी नावावर निशाणा साधूनच निवडणूकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. नोटाबंदीचे दुष्परीणाम, जीएसटी, महागाई अशा मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारला घेरले जात आहे.भुजबळ हे इतर नेत्यांची मिमिक्री करण्यात माहिर आहेत.  मागच्या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची मिमिक्री केली होती. ही मिमिक्री भाजपाच्या जिव्हावर आली आहे. आणि तुमचे हात दगडाखाली असल्याची जाणिव मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना करुन दिली आहे. 


भुजबळ सध्या जामिनावर बाहेर आहेत, किती बोलावं याचा विचार करा असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. नांदेडमध्ये आयोजित महाआघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नंरेंद्र मोदी यांची मिमिक्री करीत टिका केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आदर्श प्रकरणावरून अशोक चव्हाणांवरही तोंडसुख घेतले. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे राजकारण्यांच्या नवनव्या रणनीती, टीका, आगपाखड पाहायला मिळणार आहे.