पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये येत्या १२ तारखेला विविध उद्घाटनांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. महापालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री येत असल्याने त्यांच्या दौ-याला महत्त्व प्राप्त झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या या दौ-याच्या निमित्ताने एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय. उद्घाटन समारंभ म्हणजे अजित पवार हे शहरातलं समीकरण होतं. आता अजित पवारांची जागा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय. त्यामुळे येणा-या काळात ते पिंपरी चिंचवडचे दादा होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.


पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे अनेक दिग्गज स्थानिक नेते आहेत. मात्र शहराचं नेतृत्व करायला सक्षम नाही म्हणून देवेंद्र फडणवीस लक्ष घालत आहेत असा सरळ अर्थ या चर्चेमागे आहे, मात्र स्थानिक नेते ते मान्य करत नाहीत.