मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिरा-भाईंदर येथे प्रचार सभा घेतल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिरा-भाईंदरकरांना अनेक आश्वासनेही दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरा भाईंदर येथील जाहीर सभेतील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :


मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाला किती उंचीवर नेऊ शकते याची अनुभूती आपण घेत आहोत: मुख्यमंत्री


शहरीकरणाला आपण संधीत परावर्तित करतो आहोत. रोटी, कपडा, मकान सारख्या मूलभूत बाबींपासून लोक वंचित होते : मुख्यमंत्री


शहरीकरणाला निधी देण्याचे काम केले. २५ वर्षात जो निधी मीरा भाईंदरला मिळाला, त्याहून अधिक निधी २ वर्षात दिला: मुख्यमंत्री 


सूर्या प्रकल्पातून मीरा भाईंदरला रोज पाणी मिळेल, मेट्रोचेही काम वेगाने होत आहे: मुख्यमंत्री


आम्ही आधी काम करतो आणि मग मते मागतो: मुख्यमंत्री 


२०२२ पर्यंत सर्वांना घरे देणार. मा. नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न पूर्ण करणार: मुख्यमंत्री 


भाजपाला पूर्ण बहुमत द्या, तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण करू: मुख्यमंत्री


मीरा भाईंदरमधील दोन्ही सभांमध्ये जो जनसागर आहे, तो पाहता आता विजयाची खात्री आहे: मुख्यमंत्री


आज देशाची अर्थव्यवस्था अतिशय वेगाने वाढते आहे. गरिबांच्या मनात विश्वास बळावला आहे: मुख्यमंत्री 


शहरीकरण हे पाप नाही. त्यांना योग्य व्यवस्था द्याव्या, हा विचार करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान:  मुख्यमंत्री


२००० कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना आपल्या सरकारने मंज़ुर केली: मुख्यमंत्री


अशोक चव्हाणजी मेट्रोचे काम वेगाने होत आहे, आता संन्यास घेणार का? तो तर जनतेने तुम्हाला तसाच दिलाय: मुख्यमंत्री


भारत छोडोचा नारा देऊन ७५ वर्ष झाले,आता स्वातंत्र्याला सुराज्यात परावर्तित करण्याची वेळ आली आहे: मुख्यमंत्री